आ. रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देशातील सर्वात मोठ्या स्वराज्य ध्वजाचे वैद्यनाथ नगरीत ना. धनंजय मुंडे व शिवप्रेमींकडून जोरदार स्वागत

31

🔹भक्ती-शक्तीच्या संगमाने वातावरण प्रफुल्लित

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.22सप्टेंबर):-आ. रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून 15 ऑक्टोबर रोजी खर्डा (ता. जामखेड) येथील प्रसिद्ध शिवपट्टण किल्ल्यावर फडकवण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच (74 मीटर) स्वराज्य ध्वजाचे आज परळीत आले असता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व समस्त शिवप्रेमींच्या वतीने मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी क्षेत्रोपाध्याय मंडळींनी मंत्रोपचार करत विधिवत ध्वज पूजन केले. टाळ-पखवाजाचा निनाद एकीकडे वारकरी संप्रदायाची शिकवण तर सोबतीला संबळ व गोंधळी या पारंपरिक वाद्यांचा आवाज परिसरात भक्ती व शक्तीच्या या संगमाचा निनाद दूरवर पसरवत होता. येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वराज्य ध्वजाचे व सोबतच्या चमुचे सुवासिनी महिलांनी ओवाळून औक्षण केले.

विजयाचे प्रतीक असलेला हा देशातील सर्वात उंच ध्वज असून याची उंची 74 मीटर व वजन 590 किलो आहे. शिवप्रेमींनी दाखवलेल्या या उत्साहाबद्दल ना. धनंजयजी मुंडे व आ. रोहितदादा पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी जि.प.गटनेते अजयजी मुंडे, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधकारी, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख राजेश विभूते, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, जिल्हा बँकेचे संचालक सुर्यभाननाना मुंडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक माउली गडदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळंके, तालुका युवकाध्यक्ष गोविंद कराड त्याचबरोबर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगिताताई तुपसागर, शिवसेना विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा.अतुल दुबे, शहराध्यक्षा अर्चनाताई रोडे, युवती आघाडीच्या शहराध्यक्ष सौ.पल्लवीताई भोयटे, जिल्हा सरचिटणीस सौ.चित्राताई देशपांडे, सौ.अन्नपूर्णा ताई जाधव, नगरसेवक अय्यूब पठाण, किशोर पारधे, संजय फड, गोविंद मुंडे, बालाजी चाटे, शंकर आडेपवार, विजय भोयटे, अनिल आष्टेकर, राजेंद्र सोनी, किशोर पारधे, चेतन सौंदळे, जयराज देशमुख, गोविंद कुकर, वैजनाथ बागवाले, रविंद्र परदेशी, नारायण सातपुते, भोजराज पालीवाल, सतीश जगताप, रमेश चौण्डे, शहर सरचिटणीस अनंत इंगळे, शंकर कापसे, शिक्षक नेते डी.जी.शिंदे, शरद पवार विचार मंचचे श्रीनिवास देशमुख, अमोल कांबळे सर, राहुल ताटे सर, श्रीकांत माने, महेंद्र रोडे, रमेश भोयटे, रामेश्वर महाराज कोकाटे, ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे, दत्ताभाऊ सावंत, रवी मुळे, सतीश देशमुख, राहुल ताटे, जालिन्दर नाईकवाडे, मुन्ना बागवाले, श्रीनिवास देशमुख, जमील अध्यक्ष, अजिज कच्छी, लालाखान पठाण, जयप्रकाश लड्डा, कमलकिशोर सारडा, बालाजी वाघ, भारत ताटे, दिनेश गजमल, श्याम दासुद सर, मुन्ना बागवाले, सुरेंद्र कावरे, बळीराम नागरगोजे, जमील अध्यक्ष, सुरेश गित्ते, धम्मा अवचारे, राहुल जगतकर सर, प्रताप समिंदरसवळे, प्रणव परळीकर, सुरेश नानवटे, राज जगतकर, जयदत नरवटे, अमर रोडे अमित केंद्रे, रवि अघाव, सचिन जोशी, अजय जोशी सर, पवन फुटके, संकेत दहीवाडे, राजाभाऊ स्वामी, नारायण मुंडे, शरद कावरे, शकील कच्ची, शेख इलियास, शेख हसन, चंद्रप्रकाश हालगे, देवराव कदम, संजय देवकर, श्रीकांत माने, अभिजीत फड, पप्पु काळे, सुमित कलमे, रणधीर कोपनर, सचिन स्वामी यांनी पत्रकार मोहन व्हावळे, आत्मलिंग शेटे, प्रा.बालाजी जगतकर, निलेश जगतकर, विशाल चव्हाण, लक्ष्मण कलमे यांसह आदी शिवप्रेमी मोठया उत्साहात उपस्थित होते.