अनखोडा येथे पावसाने घर कोसळले

🔺जिवित हानी टळली मात्र लाखो रूपयांचे नुकसान

✒️श्री भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतिनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.22सप्टेंबर):- तालुक्यातील अनखोडा येथे कालच्या झालेल्या पावसाने घराभोवती दलदल निर्माण झाली व आज सकाळी गुलाब नामदेव म्हशाखेत्री यांचे रहाते घर कोसळले मात्र गुलाब च्या आईच्या सतर्कतेने जिवित हानी टळली.

आज सकाळी सहा वाजता चे सुमारास आपल्या घरात गुलाबाची आई स्वयंपाक करीत असतांना अचानक घर हलायला लागला तेव्हा तिने घराबाहेर काढता पाय घेतला नशीब बलवत्तर म्हणून गूलाबच्या आईचे प्राण वाचले घरातील बाकी मंडळी घराबाहेरच होती.

गुलाब यांचे कौलारू घर कोसळले असल्याने अंदाजे त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.शासनाने प्रधानमंत्री घरकूल योजने अंतर्गत घरकूलाचा लाभ देण्यात यावा व शासनाने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पोटे यांनी केली आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED