राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारतीचा संवाद मेळावा

🔹पद्मश्री डॉ.गणेश देवी व आमदार कपिल पाटील करणार मार्गदर्शन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागपूर(दि.22सप्टेंबर):-राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारती यांचे संयुक्त विद्यमाने कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा नागपूर येथे नवप्रतिभा महाविद्यालयात गुरुवारला दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ.गणेश देवी,राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील मार्गदर्शन करणार आहेत.मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड,शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे उपस्थित राहणार आहेत.

देशातील सध्यपरिस्थितीवर राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांची भूमिका,नागपूर विभागातील राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारतीच्या पुढील वाटचालीसाठी नियोजन,शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांवर चर्चा,पुढील आंदोलनाची रुपरेषा आदी बाबींवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे.

या मेळाव्याला समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक भारतीचे नागपूर विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,सल्लागार रावन शेरकुरे,संघटक रविंद्र उरकुडे,इम्रान कुरेशी,राजाराम घोडके,कार्याध्यक्ष जब्बार शेख,सरचिटणीस नंदकिशोर शेरकी,विलास फलके,विजय मिटपल्लीवार,प्रविन वानखेडे,प्रेमदास पवार,माध्यमिकचे भास्कर बावनकर,पुरुषोत्तम टोंगे,राकेश पायताडे,सतिश डांगे,आश्रमशाळा विभागाचे बजरंग जेनेकर,दादाजी झाडे,विशेष शाळा विभागाचे महेश भगत,पद्माकर मोरे,रामदास कामडी,महिला आघाडीच्या रंजना तडस,माधुरी पोंगळे,निर्मला सोनवने,स्मिता शेंडे आदींनी केले आहे.

नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED