2 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात पर्यावरण संमेलनाचे आयोजन

27

🔸पर्यावरण मित्र पुरस्कार व परिसंवाद

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. सप्टेंबर):- पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूरच्या वतीने शनिवार 2 ऑक्टोबर गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य पर्यावरण संमेलन तसेच पर्यावरण मित्र पुरस्कार व परिसंवादाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन बहुजन कल्याण मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. तर सहउदघाटक ना. संजय बन्सोडे राज्यमंत्री पर्यावरण पाणीपुरवठा व स्वच्छता, ना. प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री उर्जा, आदीवासी विकास, नगर विकास हे असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र, आदीवासी सेवक व संपादक डी. के. आरीकर हे राहतील.

तसेच विशेष अतिथी म्हणून अर्जुनी मोरगाव क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार किशोरभाऊ जोरगेवार, विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती राहणार आहे. सोबतच ईश्वर बाळबुद्धे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल (म. प्र.), राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष राष्टवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर, अशोक करे प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, राजेश येसनकर जिल्हा माहिती अधिकारी चंद्रपूर, किरण मोरे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, संतोष रावत अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, नरेंद्र स्वान अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ, हिराचंद बोरकुटे, दिपक जयस्वाल, बेबीताई उईके, ज्योती रंगारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणा-या पर्यावरण मित्र पर्यावरण मित्र व पर्यावरण विशेषांचे प्रकाशन, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण, गुणवंत विद्यार्थी सन्मान इत्यादी पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण संवर्धन व विकास समिती तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. पर्यावरण संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन हरीश ससनकर मुख्य संयोजक यांनी केले आहे.