24 सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या प्रलंबित समस्येसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22सप्टेंबर):-जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्या आहेत. वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या पेन्शन तयार होण्यास विलंब लागत आहे. हिंदी, मराठी सुट, संगणक सुट या बाबीसाठी सुद्धा पेन्शन केस थांबलेल्या आहेत. अश्या अनेक समस्या जाणून घेण्यासाठी व संघटनेची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरने २४ सप्टेंबरला जनता महाविद्यालय चंद्रपूरच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यनेते विजय भोगेकर, राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील कोल्हापूर, राज्य महिला मंच अध्यक्ष अल्का ठाकरे, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी स्व. आर. जी. भानारकर शिक्षक नेते यांचा सकाळी ११ वाजता श्रद्धान्जली कार्यक्रम होणार आहे.

या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष नारायण कांबळे व सरचिटणीस रवी सोयाम यांनी केले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED