नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन – विशाल सरवदे

26

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

कोथरूड(दि.२२सप्टेंबर):- येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम लक्षात घेऊन, वंचित बहुजन आघाडीचे कोथरूड विधानसभा सचिव मा.विशाल सरवदे व विजय प्रधान यांनी निवडणूक अधिकारी २१० कोथरूड विधानसभा,यांची भेट घेऊन नवीन मतदार नोंदणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११येथील हनुमाननगर येथे नवीन मतदार नोंदणी, नांव दुरुस्ती,नांव कमी करणे करण्यासाठी अनेक नवयुवक हे मतदानाचा हक्क बजावण्यापासुन वंचित आहेत.त्या संदर्भात निवडणूक अधिकारी यांनी या कामी नाव नोंदणी दुरुस्ती नांव कमी करणे यासाठी अर्ज व संबंधित बुथलेवलवर नोंदणी ऑफिसर नियुक्त करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कोथरूड विधानसभा सचिव विशाल सरवदे व विजय देवीदास प्रधान यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.