कुंभेझरी ते नारायण गुडा रस्त्याच्या निष्कृट दर्जाचा कामाची चौकशी करा

🔹भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेची मागणी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.22सप्टेंबर):-भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिवती, नामदार अशोकराव चव्हाण बांधकाम मंत्री, मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रं. १ चंद्रपूर यांना निवेदन देऊन.रस्त्याच्या निष्कृट दर्जाचा कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली मानीकगड पहाडावरील जिवती तालुका अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो ग्रामीण आदिवासी भागाला दर्जेदार रस्त्यांनी जोडले जावे दुरवस्था झालेल्या रस्त्याचे पुनरुज्जीवन करुन सर्व खेड्यापाड्यात विकास करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि इतर अनेक योजनेवर शासन कोट्यवधी निधी उपलब्ध करून देत आहे.

तरी पण कुंभेझरी ते नारायण गुडा पळसगुडा या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले असून काम करणारी यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रं.१ चंद्रपूर या विभागा अंतर्गत कुंभेझरी ते नारायण गुडा पळसगुडा काम सुरू झाले. काम सुरू करण्याची दिनांक ते काम पूर्ण करण्याची दिनांक संपूण सुध्दा काम कासव गतीने सुरू आहे.

या रस्त्याच्या कामात स्थानीक परिसरातील मुरुमाचा उत्तखनन करुन मुरुमाचा वापर रस्त्याच्या कामात करण्यात येत आहे.हा मुरुम निकृष्ट दर्जाचा असल्याने रस्त्याचे काम बोगस होत आहे.या मुरुमाची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी व स्थानिक परिसरातील मुरुमाचा उत्तखनन केलेल्या मुळे संबंधित काम करणाऱ्या मे.गुप्ता कंष्ट्रक्शन नागपूर या कंत्राटदारावर व संबंधित अभियंत्यांवर विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी अन्यथा. भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या वतीने आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उध्दव गोतावळे जिवती तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED