सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांड्यावर अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी

🔸गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांच्याकडे मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22सप्टेंबर):-सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथे अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे दिनांक 12 सप्टेंबर रोजी अत्याचार करून तिच्या परिवाराला धमकावीत जीवे मारण्याची धमकी आई-वडीलयांच्यासह भावाला दिल्याने पीडित मुलगी तणावात असताना विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवली या घटनेमुळे परभणी जिल्ह्यात सर्वत्र मुलीबद्दल हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज सोनपेठ तालुका बंद असून गंगाखेड याठिकाणी गोर सेना यांच्यावतीने आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यातील आरोपी आदर्श माणिक शिंदे, मयूर मुंजा मुठाळ, सुशील भगवान शिंदे या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवावा, या प्रकरणात ॲड.उज्वल निकम यांची नेमणूक करावी, उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास करावा, मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, त्यांना आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरीत समावेश करावा अशी मागणी यावेळी गोर सेना प्रा. संदेश चव्हाण संघनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी विभागीय अध्यक्ष धोंडीराम आडे ,महिला जिल्हा अध्यक्ष लक्ष्मी आडे ,तालुका अध्यक्ष स्वप्निल राठोड, जिल्हा सचिव राजेश राठोड, शहराध्यक्ष अर्जुन राठोड, जिल्हा संघटक गणेश राठोड, अभय चव्हाण, लहू राठोड, समाजसेविका सूर्यमाला मोतीपवळे, सुनिता घाडगे, सविता राखे ,निकिता रामकिसन लंगोटे, संतोष राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, अरुण आडे, पुंडलिक राठोड, विलास राठोड अंकुश राठोड हे उपस्थित होते.यावेळी मनिषा हिला न्याय मिळावा यासाठी विद्यार्थी मुली यांनी ही सहभाग नोंदवुन निषेद नोंदवला.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED