चामोर्शी – मारकंडा कंनसोबा येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भविष्य अंधारात

🔸विद्यार्थी आणि पालकांची मागणी

🔹रस्ता रोको आंदोलन करण्याचा विद्यार्थी पालकांचा इशारा

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतिनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.22सप्टेंबर):- आष्टी शहरात कॉलेज, विद्यालय, प्रशिक्षण शिक्षण तसेच इतर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी बस थांबा नसल्याने आष्टी येथे जाणे-येण्या करिता अडचण होत असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अहेरी. नागपूर. गडचिरोली. धावणाऱ्या बसेसला बस थांबा देण्यात यावी अशी मागणी मारकंडा (कं) येथील विद्यार्थी आणि त्यांचे पालक करीत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी शहर परिसरातील शिक्षणासाठी माहेरघर आहे.

आष्टी येथे महाविद्यालय, विद्यालय, प्रशिक्षण केंद्र तसेच इतर शिक्षण उकुष्ठ दर्जाचे मिळते यासाठी आष्टी परिसरातील पालक वर्ग आपले मुले शिक्षण घडविण्यासाठी तेथील शाळेत शिकवीत असतात. तिन चार की. मी. अंतरावरून विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी जाणे-येणे करतात. विद्यार्थ्यांना परिवहन मंडळ कडून पासेसची सेवा करण्यात आली आहे. परंतु बस थांबा बंद असल्यामुळे विद्यार्थी शिक्षना पासून वंचित होत आहे.

रोज शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी बस स्थानक येथे बसची वाट पाहतात परंतु बस थांबत नसल्याने विद्यार्थी खाजगी वाहनाने शाळेसाठी प्रवास करीत आहे. विद्यार्थी खाजगी प्रवास करीत असले तरी पालक वर्गांना आर्थिक खर्च परवडत नाही. यासाठी विद्यार्थी प्रवासा अभावी शिक्षण घेऊ शकत नाही.विद्यार्थ्यांचा शालेय भविष्य आणि अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अहेरी ते नागपूर. गडचिरोली धावणाऱ्या बसेस ला मारकंडा कंनसोबा येथील बस थांब्यावर बसेस थांबविण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED