भोद बु ता धरणगाव येथे शिस्तबद्ध वातावरणात सेवा समर्पण अभियान अंतर्गत कोविड लसीकरण संपन्न

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगाव(दि.22सप्टेंबर):-कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आज देशभरात व राज्यभरात कोविड लसीकरण करून नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार कार्य करत असून , गावा गावातील नागरिकाना लसीकरणाची उपलब्धता करून देण्यात येत आहे.

भारताचे जनसेवक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने सेवा समर्पण अभियान अंतर्गत सौरभ देसले यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा धरणगाव तालुका व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने लसीकरण शिबीर भोद बु|| येथे ५०० कोविशिल्ड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

त्या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पि.सी.आबा पाटील, जि. प.सदस्या माधुरीताई अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन,भाजपचे तालुकाध्यक जिजाबराव पाटील जगन्नाथ पाटील, भगतसिंग आप्पा, भाजप तालुका सरचिटणीस सुनील सर पाटील,धरणगाव ओबीसी तालुकाउपाध्यक्ष सुनील चौधरी,सुनील बडगुजर इत्यादी मान्यवर उपस्थित होते..

भोद बु गावातील भाजपचे कार्यकर्ते त्रिलोकसिंग पाटील,भटु देसले, योगेश देसले ईश्वर बडगुजर,प्रेमसिंग देवराळे,हिम्मतसिंग पाटील,वसंत सोनवणे, प्रमोद देसले यांचे अनमोल सहकार्य लाभले.

तसेच लसीकरण लाभार्थी यांना लाभार्थी सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला..