मानव विकास परिषद .(म .राज्य) यवतमाळ व पुसद. युनिट तफेँ .मा.अनुराग जैन साहेब. ( आय.पी.एस.)यांचा ह्रदय सत्कार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.22सप्टेंबर):- येथील ,उपविभागीय पोलीस अधिकारी मा.अनुराग जैन साहेब यांच्या झालेल्या. बदली निमित्त मानव विकास परिषदेच्या वतीने शाँल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. माविप.चे प्रदेशाध्यक्ष. मा.बळवंतराव मनवर व.जिल्हाध्यक्ष मा.प्रा.आर.पी.गव,ई.यांचे हस्ते शाँल व श्रीफळ देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी दारव्हा येथे ,एस.डी.पी.ओ.पदावर कार्यरत असलेले पोलीस अधिकारी मा.आदित्य मिलखेरकर साहेब.(आय.पी.एस.).यांचाही यथोचित सत्कार परिषदेचे कार्याध्यक्ष सलीमभाई यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.,तसेच उपस्थित पदाधिकारी यांनी ए.एस .आय.मा.रेवण जाग्रुत साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी परिषदेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.अनिल चव्हाण ,जिल्हासचिव बाळासाहेब गजभिये,जिल्हा सदस्य महेश निखाते.. पुसद. तालुकाध्यक्ष मो.हमीद,सचिव कयूमभाई, उपाध्यक्ष विवेक मन्नरवार,कार्याध्यक्ष उत्तरवार सर, .संपर्क प्रमुख गजानन ईंगळे उपस्थित होते. सत्कारानंतर मा.जैन साहेबांनी परिषदेच्या कार्याबद्दल सदिच्छा व समाधान. व्यक्त केले. …. .. ..मानव विकास परिषद म्हणजे, शोषित, श्रमिक, पोलीस कोठडीत मु्त्यु,बेकायदेशीर अटक,मागासवर्गीयांवर होणार अन्याय, मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, ई.समस्या नी ग्रस्त असलेल्या घटकांना मानव विकास परिषद संविधानिक व सनदशीर मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून न्याय देण्याचा निरपेक्षपणे प्रयत्न करीत आहे.

मानव विकास परिषद अशाप्रकारची एकमेव सामाजिक संघटना आहे की,जी मानव विकासा करिता नागरिकांना आपले मूलभूत अधिकार व हक्क ई.चे संवर्धन करून लोकांना जागरूक करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे मानव विकास परिषदेला जनतेकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वरीलप्रमाणे अडचणी व समस्या निर्माण झाल्यास ,*मानव विकास परिषद म.राज्य. पुसद येथील सुभाष चौकात असलेल्या कार्यालयात संपर्क साधावा.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED