अर्हेर – नवरगाव येथील तंटामुक्त समीतीच्या अध्यक्षपदी दुर्योधन ठेंगरे (महाजन) यांची निवड

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.22सप्टेंबर):-तालुक्यातील अर्हेर – नवरगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा 22 सप्टेंबर रोजी बुधवार अर्हेर – नवरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. दामिनीताई जागेस्वर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत भवनासमोरील पटांगणात पार पडली.यावेळी झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समीतीच्या अध्यक्षाची निवड करायची होती. यामध्ये गावातील दोन जण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने सदर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत गावातील 2 जण रिंगणात उभे होते. यामध्ये दुर्योधन पांडुरंग ठेंगरे (महाजन) यांना अधिक 74 मते मिळाली.

त्यामुळे त्यांची तंटामुक्त समीतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर सदस्यपदी सुभाष ठेंगरे पाटील , देवलाल ठेंगरे, ईश्वर कुथे,बंडू ठाकरे, मुन्ना कावळे, विलास जनबंधू , उमाजी कराणकर, विनायक बगमारे,विनीत ठेंगरे,नीलकमल नंदनवार, रोशन मदनकर यांसह अन्य इतर सदस्यांची निवड करण्यात आली.यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.