मुख्यमंत्री सिचंन योजनेतुन मामा तलावाचे खोलीकरण करा- आबीद अली

30

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.23सप्टेंबर):-कोरपना येथे शासकीय गाव तलाव आहे ग्रामपंचायतचा दर्जा वाढ होऊन येथे नगरपंचायत असत्तित्वात आहे नगरातील वाढती लोकसख्यां झपाट्याने नागरी वस्तीचा विस्तार होत असल्याने येथे पाण्याचे वाढती मागणी गावात निर्माण होणारी पाणीटंचाई भूगर्भात जलसंचयनाची आवश्यक गरज भेडसावित आहे गावात स्वतंत्र्याचे ७४वर्ष लोटले मात्र येथे नळ योजना निर्माण झाली नाही.

यामुळे तापमान वाढताच गावावर टँकरने तुष्णा भागविण्याची पाळी येते मोठ्या प्रमाणात गावात बोअरवेल निर्माण झाल्याने पाण्याची पातळी खालाविली गावात विषेश म्हणजे एकही पिण्याचे पाण्याची विहीर अस्तीत्वात नाही पुर्व काळातील गावात पाण्याचे विहीर ग्राम पंचायतीने बुझविल्याने पुरातन काळातील पाण्याचे स्रोत नष्ट झाल्याने नाविन पिढीला विहीर म्हणजे काय यांच उतर शोधावा लागेल असे जिल्हयातील विहीर व नळ योजना मुक्त गाव म्हटल तर वावग ठरणार नाही मात्र उन्हाळ्याचे चटके व पाण्याची टंचाईसाठी कोरपना येथील सरकारी मामा तलाव नगरपंचायतीने ताब्यात घेऊन तलावाचे खोलीकरण जलसंचयन मुख्यमंत्री सिंचन योजना किवा सि ‘ एस. आर फंडातुन तलावाचे काम घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली यांनी जिल्हाधिकारी पालकमत्रीं विजय वडेट्टीवार खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे