शिवशंभू छावा प्रतिष्ठाणचा प्रथम वर्धापण दिन कोरोना नियम पाळुन उत्साहात साजरा

✒️विशेष प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले,राजगुरुनगर-खेड)

खेड(दि.23सप्टेंबर):- शिवशंभू छावा प्रतिष्ठाणचे प्रथम वर्धापण दिनाचे औचित्या साधुन धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापुर ते प्रतिष्ठाणचे मुख्य कार्यालय श्रीक्षेञ निमगाव खंडोबा पर्यत ज्योतीचे व रॕलीचे नियोजन करण्यात आले. विविध ठीकाणी ज्योतीचे उत्साहाने वाजंञ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. निमगाव खंडोबा मुख्य कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाप्पुसाहेब थिटे ,महाराष्ट्र राज्य उपअध्यक्ष गणेशशेठ सांडभोर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्याताई शिंदे, जय मल्हार क्रांति संघटनेचे महा.राज्य युवक अध्यक्ष रोहीदास मदने, जिल्हा परिषद सदस्यबाबाजीशेठ काळे अमरभाऊ शिंदे यांनी आपले विचार मांडले तसेच महा.राज्यचे कायदेशीर सल्लागार अॕड. राहुलशेठ तांबे यांनी विचार व्यक्त करताना प्रतिष्ठाणच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहुन गोरगरीब जनतेचे सर्व प्रकारे काम करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला राहुलशेठ काकडे, दताभाऊ टाकळकर, आदित्य कुंचाळे, सचिनभाऊ राक्षे, नवनाथ कुल्लाळ, सचिन मैंड, स्वप्नील पर्हाड, बाळासाहेब शितकल, सरीताताई चव्हाण, सुवर्णाताई शिंदे, संगिताताई गोरगल्ले, प्रसाद मावळे, संभाजी शिंदे, राहुलशेठ भंडलकर, आदित्य काकडे, प्रितम गायकवाड, सर्व पदाधिकारी उपस्थित होतेतसेच शिवकार्या साठी नविन पदाधिर्कांच्या निवडी करण्यात आल्या .महाराष्ट्र राज्यचे सचिव मनोहरजी गोरगल्ले यांनी सुञ संचालन केले, संस्थापक अध्यक्ष भरतशेठ पवळे यांनी संघटनेची धेय्यधोरणे सांगुन सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED