27 सप्टेंबर पासून गडचिरोली येथे नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

43

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23सप्टेंबर):-भारतीय जनसंसद,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, ग्राम् सन्वाद्, सरपन्च् संघटना सर्वपक्षीय,ग्रामपंतायती,व परीसरातील जनतेच्या वतिने
गडचिरोली जिल्ह्यात माणसावर हल्ला करीत प्रंचड धुमाकुळ माजविणा-या नरभक्षक वाघाने वनविभाग वडसा आणि गडचिरोलीच्या वनव्याप्त कार्यक्षेञात व शेतकरी बांधवाच्या शेतालगत जवळपास 15निप्षाप माणसाचे बळी घेतले.अनेक व्यक्तीना वाघाने हल्ला करुन जखमी केले.

एवढेच नव्हे तर अनेक शेतकरी कुटू्बातील गाई,म्हशी,बक-या फस्त केल्या ज्या मुळे परीसरातील जनता नरभक्षक वाघाच्या दहशतीत पुर्णपणे भयभित झाली असुनअनेक शेतकरी बांधव आपल्या शेतावर जाणे बंद केले.व परीसरातील नागरीक घराच्या बाहेर पडायला घाबरत अाहेत.यात शेक-याची अतोनाथ नुकसान झालेली आहे.तेव्हा नरभक्षी वाघाला बंद करण्या करीता भारतीय जनसंसद,जिल्ह्यातील सर्वपक्षीय परीसरातील अनेक ग्राम पंचायती तेव्हा गडचिरेलीच्या वनसंरक्षकानी नरभक्षक वाघाला लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन देवूनही ऩिष्क्रीय व निष्काळजीपणा करणा-या वनविभागातील कर्मचारी व अधिका-याना सदर वाघाला जेरबंद करण्या करीता अपयश आले.आणखी नरभक्षक वाघ किती बळी घेणार असा प्रश्न परीसरातील जनतेमध्ये निर्मान झाला असुन पुन्हा एकदा शासन, प्रशासनाचे व जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधण्या करीता मा. जिल्हाधिकारि कार्यालय समोर दिनांक.२७/९/२०२१पासुन् बे मुदत साखळी उपोषण करीत आहोत.यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे…

*मुख्य मागण्या*
15निष्पाप लोकांचे बळी घेणा-या व शेतक-याचे गाई,म्हशी,बकल्या फस्त करणा-या नरभक्षक वाघाला ठार मारा.,
उप वनसंरक्षक वनविभाग वडसा व उप वनसंरक्षक वनविभाग गडचिरोली यांचेवर मणूष्य वधाचे तात्काळ गुन्हा नोंद करा.
वडसा व् गडचिरोली .या दोन्ही उप मुख्यवन् संरक्षक यांची जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करा.
अकार्यक्षम वनाधीकारी व वनकर्नचा-यांची हकालपटी करा.
चुरचुरा येथील अंदाजे 40 एकर जागेत अवैद्य व्रुक्षतोड करुन वनसंपतीचे -हास करणा-या दोषी वनरक्षक,वनपाल,वनपरीक्षेञाधीकारी याचेवर तातडीने निलंबनीची कार्यवाही करुन त्यांचेवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंद करावे.

नरभक्षक वाघाच्या दहशतीत शेती न करणा-य़ा अथवा वाघाच्या भिती पोटी अनेक शेतकरी शेतावर न गेल्याने त्यांच्या शेत पिकाची नुकसान झालेलाी आहे.अशा सर्व शेतकरी बांधवाना महसुल व वनविभागा कडून प्रत्येकी हेकटर् एक् लाख् रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे.घोटचे वनपरीक्षेञाधीकारी यांचे कारकीर्दीत झालेल्या एकुन कामाची व त्यावरील एकुन खर्चाची एकुन आर्थीक व्यवहीराची चौकशी समिती मार्फत सखेल चौकशी करुन कार्यक्षम वनपरीक्षेञाधीका-याची घोट वनपरीक्षेञात नियुक्ती करावे या व अन्य मागण्या संदर्भात .वरील संपुर्ण मागण्याची पुर्तता करण्या करीता विश्वस्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा संघटक भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे भ्रस्टाचार विरोधी जिल्हा संपर्क प्रमुख योगाजि कुडवे , अतुल राऊत मनोहर पाटील. zanjal, सुधीर रेवाडे,रेवनाथ् मेश्राम रवी सेलोटे ,धनजय दोइजड परीसरातील नागरीकाच्या वतिने करण्यात येत आहे.