जिवती येथे मातंग समाज अन्याय निवारण समितीची कार्यशाळा संपन्न

28

🔸डॉ गोतावळे यांनी वाढदिवसानिमित्य आयोजित केले सामाजिक प्रबोधन शिबीर

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.23सप्टेंबर):-दि .20 सप्टेंबर 2021 रोजी
डॉ अंकुश अर्जुनराव गोतावळे यांचा 39 वा वाढदिवस होता .वाढदिवसाचे औचित्य साधून मातंग समाज अन्याय निवारण समिती शाखा जिवती जि चंद्रपूर च्या वतीने
मातंग समाजातील युवकांची एकदिवशीय कार्यशाळा घेऊन समाजातील युवकांचे प्रबोधन केले .आणि मातंग समाजाच्या विविध प्रश्नांची सखोल माहिती युवकांना दिली सोबतच त्यावरील उपाययोजना सांगितल्या आणि भविष्यात मातंग युवकांना पुरोगामी चळवळीसाठी प्रशिक्षित करण्याची सुरुवात केली .सोबतच श्री केशव शेकापूरकर लिखित वंचित जाती (मातंग /मादिगा )आणि आरक्षणातील वर्गवारी या पुस्तकाचे प्रकाशन केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून श्री विलासभाऊ साबळे ,प्रवक्ते -मातंग समाज अन्याय निवारण समिती तसेच श्री .भास्करजी नेटके ,राज्य समन्वयक -मातंग समाज अन्याय निवारण समिती हे उपस्थित होते .तसेच मातंग समाज अन्याय निवारण समिती शाखा जिवती चे अनेक मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला .पहिल्या सत्रात दुपारी 3 ते 6 प्रशिक्षण कार्यशाळा व प्रकाशन सोहळा घेण्यात आला तर दुसऱ्या टप्यात साय .6 ते रात्री 9पर्यंत डॉ गोतावळे यांचा वाढदिवस साजरा करून सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.

कार्यशाळेसाठी प्रामुख्याने प्रा .सुग्रीव गोतावळे (माजी सभापती ,पं स जिवती ),श्री भानुदास जाधव ,श्री देविदासजी कांबळे ,डॉ .पांडुरंग भालेराव ,डॉ अंगद कांबळे ,श्री .व्यंकटी तोगरे सर ,श्री दत्ता दोरे सर ,श्री .भगवान डुकरे सर ,प्रा लिंबोरे सर ,श्री दीपक गोतावळे सर श्री पंडित पवार सर ,श्री यादव भालेराव ,डॉ चरण केडासे श्री पंढरी वाघमारे ,श्री उत्तम कंचकटले ,श्री बालाजी वाघमारे ,श्री दिगंबर केंद्रे ,श्री दत्ता गायकवाड ,श्री बालाजी गायकवाड श्री सागरे पाटील ,श्री रवी कांबळे पोलीस पाटील ,श्री संतोष गोतावळे पोलिस पाटील ,श्री लहुजी गोतावळे उपसरपंच ,श्री शांतकुमार गोरे ,श्री साईनाथ गायकवाड ,श्री राम मोरे ,श्री जयंत गोतावळे ,श्री संजय भालेराव ,श्री अनिल बसवंते ,श्री सूर्यकांत कांबळे ,श्री चंद्रकांत कांबळे ,श्री प्रा विजय गोतावळे गोतावले श्री अंबादास गोतावळे ,सिद्धार्थ जाधव ,श्री गोविंद वाघमारे ,श्री वैजनाथ सूर्यवंशी ,श्री रणजित सूर्यवंशी ,श्री अजय नरहरे ,श्री संदीप आंदे ,श्री बालाजी दुधगोंडे ,श्री आनंद पवार ,श्री व्यंकटी कोतंबे सर ,श्री सुनील गोतावळे श्री लक्ष्मण गोतावळे ,श्री गणेश बटवाडे ,श्री बळीराम मेकाले आणि इतर अनेक युवक उपस्थित होते .तर दुसऱ्या सत्रात वाढदिवसासाठी विविध समाजाच्या सामाजिक संघटनांचे आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,शासकीय कर्मचारी, मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते .