वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा-तहसीलदार यांना निवेदन सादर

✒️समुद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

समुद्रपूर(दि.23सप्टेंबर):-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण जीवनभर भारत देशाची सेवा केली, त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेण्यात यावी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा ही मागणी घेऊन सर्व गुरुदेव सेवकांच्या माध्यमातून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचावे व शासन दरबारातुन वंदनीय राष्ट्रसंतांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात यावी.

त्यांच्या संपूर्ण कार्याची दखल घेऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, या मागणीसाठी समुद्रपूर तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्याच्या वतीने तहसीलदार साहेब समुद्रपूर जिल्हा वर्धा यांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED