बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जयंती सोहळ्याचे आयोजन

30

🔹२५सप्टेंबर शनिवारला डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आलेले आहे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.२३सप्टेंबर):- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र तथा राज्यसभेचे माजी उपसभापती व आंबेडकरी चळवळीचे सरसेनानी,रिपब्लिकन पक्षाचे नेते दिवंगत बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन दिनाक २५सप्टेंबर २०२१ रोज शनिवारला सकाळी ११.०० वाजता आभासी पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारोतराव कांबळे हे राहणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. मुकुंद मेश्राम श्रीमती राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदा नागपूर यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी विचारवंत लेखक प्रा. प्रकाश जंजाळ कारंजा वाशीम यांचे प्रमुख मार्गदर्शक दर्शन लागणार आहे या कार्यक्रमा प्रीत्यर्थ सन्माननीय सदस्य संस्थेचे पदाधिकारी डॉ. राजेश कांबळे उपाध्यक्ष,पी.व्ही.मेश्राम,सदस्य,पी.एच.खोब्रागडे सहसचिव, एस.बी.कांबळे सदस्य,डी.जी. खोबरागडे सदस्य, आर.डी.कांबळे सदस्य, एस. आर.कांबळे सदस्य, डी.डी.कांबळे सदस्य आदीच्या प्रमुख उपस्थित जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे.आभासी पद्धतीने होऊ घातलेल्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ.देवेश कांबळे यांनी प्रसिद्ध पत्रातून केले आहे.