लायन्स क्लब गंगाखेड तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23सप्टेंबर):-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लायन्स क्लब गंगाखेड टाऊन व रामप्रभू मुंढे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटक रुद्राक्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ आंधळे तर अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मंजूताई दर्डा या उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून साधनाताई जाधव, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.मनीषा राठोड, पद्मजा कुलकर्णी, प्रेमलता नावंदर, संगीत जामगे, ऍड स्मिता देशमुख, डॉ. अर्जुन सोनवणे आदींची उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल गंजेवार, सचिव गोविंद रोडे, कोषाध्यक्ष महादेव गीते ,डायरेक्टर गोपाळ मंत्री, भगत सुरवसे अभिनय नळदकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ. डॉ. रितेश वट्टमवार यांनी केले. रक्तदानानंतर उपस्थित रक्तदात्यांना लायन्स क्लब तथा शासकीय रक्तपेढी तर्फे प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला.

यासाठी लॉ. बालासाहेब यादव यानी दूध व संतोष गुंडाळे यांनी बिस्कीट देऊन सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगन्नाथ आंधळे, राजीव आहेरकर ,बालाजी ढाकणे,संभाजी वाडेवाल,कुबेर खांडेकर,पुषोत्तम भंडारी,ज्ञानेश्वर गुंडाळे,बालाजी कांदे,प्रकाश सुर्वे,अभिजित चौधरी, उमेश पापडु, केशव देशमुख, रामेश्वर तापडिया, संजय तापडिया, दादा कापसे, चंद्रकांत गादेवार, मोहन गीते,विजय जाधव, प्रकाश घण ,राजु लांडगे, धोंडीराम शेटे आदींनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सुपेकर तर आभार प्रदर्शन गोपाळ मंत्री यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED