सीए परीक्षा उत्तीर्ण सतिष आघाव यांचा भास्कर ॲकडमीच्यावतीने सत्कार

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.23सप्टेंबर):- तालुक्यातील हातोला या गावातील ऊसतोडणी कामगाराचा मुलगा सतिष मोहन आघाव सी.ए.फायनल परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल भास्कर एज्युकेशन अकॅडमी च्या वतीने आष्टी येथे सत्कार करण्यात आला.

एका ऊसतोडणी कामगाराच्या मुलाला सी.ए.परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन भास्कर एज्युकेशन अकॅडमीचे इंजिनीयर प्रा.शिवाजी राख व सीए अशोक आघाव यांचे लाभले आहे.अशा भावना सतिष आघाव यांनी सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केल्या.

यावेळी बीडच्या मा.जि.प.अध्यक्षा सविताताई विजय गोल्हार,सूर्यकांत मोकासे सर,गहिनीनाथ डोंगरे सर,प्रा.शिवाजी राख,सरपंच एम.डी. लटपटे,मोहन आघाव,रामदास गोल्हार,अफसर भाई शेख,किशोर गोरे,राहुल पंडागळे,श्यामली हंबर्डे,प्रतीक्षा करंडे,सारिका तरटे,विठ्ठल जगताप,ह.भ.प.विजय राजपुरे(मामा) तसेच अकॅडमीतील विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED