खेलो इंडिया केंद्र आर्चरी या खेळाचे प्रशिक्षणाकरीता खेळाडूंची निवड चाचणी

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23सप्टेंबर):- क्रीडा मंत्रालय केंद्र शासन यांनी खेलो इंडिया सेंटर अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आर्चरी या खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजुर केलेले आहे. सदर प्रशिक्षण केंद्रावर तीस प्रशिक्षणार्थ्यांची संख्या व एक प्रशिक्षक अशी संख्या निर्धारीत केलेली आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील आर्चरी खेळातील इच्छुक खेळाडूंनी आर्चरी प्रशिक्षणार्थीची निवड चाचणी करीता दि. 29/09/2021 रोजी सकाळी 10 वाजता क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स एरिया, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थित राहावे. सदर निवडचाचणी मधुन मुले-मुली 30 खेळाडूंची नियमित होणाऱ्या आर्चरी प्रशिक्षणाकरीता निवड करण्यात येईल. सदर प्रशिक्षणाचा उद्देश केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असुन, राज्याच्या हिताची आहे.

विविध आंतररराष्ट्रीय स्पर्धांकरीता पुरक असुन, यामधुनच पुढील काळात होणाऱ्या सन 2024, 2028, 2032 च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच सदर आर्चरी प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षकाची निवड करण्यात येणार असून फक्त गडचिरोली जिल्ह्यातील आर्चरी खेळातील राष्ट्रीय/राज्यस्तर खेळाडू बि.पी.एङ/एम.पी.एङ व कमीत कमी दहा वर्षाचा प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या पात्र इच्छुकांनी आपला अर्ज दि. 27/09/2021 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. घनश्याम राठोड यांनी आवाहन केले आहे.
******