खासदार असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23सप्टेंबर):-हैदराबाद चे खासदार तथा ऑल इंडिया मजलिस-ए -इत्तेहादुल मुस्लिमीन चे संस्थापक अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांच्या दिल्ली येथील राहत्या निवासस्थानावर काही अज्ञात समाजकंटकांनी दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी धाड हल्ला केला या घटनेचा एम आय एम परभणी जिल्हा व गंगाखेड तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना दिनांक 23 सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदवित खासदार असदुद्दिन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहेत.

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत विशेषता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे घर आठ किलोमीटरवर अंतरावर असताना देशाचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या निवासस्थानावर हल्ला होतो ही घटना देशात निंदनीय आहे. खासदार ओवेसी यांच्याकडून पोलिसांना सूचना देऊनही हल्ला होत असेल तर देशाच्या सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एम आय एम चे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार ओबीसी यांच्या सुरक्षेत वाढ करावी त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी ही मागणी सध्या जोर धरत आहे. परभणी जिल्हा तथा गंगाखेड तालुका यांच्या वतीने जिल्हा युवा अध्यक्ष शेख राजू तालुका अध्यक्ष अजहर शेख ,युवा तालुकाध्यक्ष सय्यद सद्दाम, वाहज खान, नयुम भाई ,चांद आली, जावेद शेख, नईम शेख, फिरोज खान, अलीम शेख, जफर शेख, जावेद शेख, वाहेद शेख, शाहेद शेख, जुनेद पटेल ,समीर शेख यांच्या वतीने प्रभारी तहसिलदार डि.डि.धोंडगे,तलाठी मुळे,मंडळधिकारी सोडगीर यांच्या मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे झेड प्लस सुरक्षा ची मागणी करण्यात आली आहे.