ब्रम्हपुरी मध्ये उपविभागीय अधिकारी संदीप भस्के व तहसीलदार उषा चौधरी रुजू

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24सप्टेंबर):-ब्रम्हपुरी तहसील कार्यालय येथे कार्यरत असलेल्या उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे यांच्याबदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर उपविभागीय अधिकारी संदीप भस्के रुजू झाले व तहसीलदार विजय पवार यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर तहसीलदार उषा चौधरी रुजू झाल्या आहेत.

उपविभागीय अधिकारी संदीप भस्के हे उपजिल्हाधिकारी भुसंपादन (विपविम क्र. १ ) म्हणून भंडारा येथे कार्यरत होते. तर तहसीलदार उषा चौधरी तहसीलदार म्हणून सडक अर्जुनी (गोंदिया) येथे कार्यरत होते.