सतिश डांगे यांची शिक्षक भारती नागपूर विभागीय सहप्रसिद्धी प्रमुखपदी निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24सप्टेंबर):- नुकताच राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारती च्या वतीने तालुका ,जिल्हा व नागपूर विभागातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त तथा मुंबई चे शिक्षक आमदार कपील पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्याबरोबर राष्ट्रीय सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख ,महा.राज्य. प्राथमिक शिक्षक भारती चे अध्यक्ष नवनाथ गेंड ,शिक्षक भारती चे राज्य उपाध्यक्ष राजेंद्रजी झाडे साहेब ,शिक्षक भारती चे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे , हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात कोरोना काळात कोरोना सर्वेवर ज्यां शिक्षकांना जीव गमवावा लागला त्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार कपिल पाटील साहेबांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतांना केंद्र सरकारच्या चुकीच्या नविन शैक्षणिक धोरनावावर सडकून टीका केली.,केंद्र सरकारच्या चुकीच्या नीती ,धोरणतत्वे आणि खाजगीकरनाचा ओघ विध्यार्थ्यांना किती धोकादायकआहे हे पटवुन सांगताना फुले, शाहू ,आंबेडकर, साने गुरुजी, सावित्रीबाईफुले, फातिमाशेख यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज व्यक्त केली. गावागावात राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून “संविधान घर” निर्माण झाले पाहीजे.साने गुरुजी बालभवन निर्माण करून त्या माध्यमातून विद्यार्थी घडले पाहिजे,संविधानाच महत्त्व लोकांना पटल पहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या संवाद मेळाव्यात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संवाद मेळाव्यात शिक्षक भारतीच्या चळवळ बांधणीसाठी काही महत्त्वाची जबाबदारी काही तालुका व जिल्हापदाधिकारी यांना देण्यातआली.यात चंद्रपूर जिल्ह्यातील नेवजाबाई हितकारिणी विद्यालय नवेगाव पांडव तह नागभीड येथील शिक्षक सतिश डांगे यांना नागपूर विभागाचे सहप्रसिध्दी प्रमुख हे पद देण्यात आले .या पदाच्या नेमणुकीचे प्रमाणपत्र मुंबई शिक्षकआमदार कपिल पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. कुसुमताई झाडे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकभारती चे जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांनी पार पाडले.या नेमणुकीसाठी सतिश डांगे यांनी भाऊराव पत्रे सर,संजय खेडीकर सर,सुरेश डांगे सर,राजेंद्र झाडे सर यांचे आभार मानले.

नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED