तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे मल्ल महवाघ चा सत्कार

✒️ धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील)

धरणगाव(दि.24सप्टेंबर):– येथील कुस्तीपटू महेश रमेश वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले त्याबद्दल महेश वाघ तसेच त्याचे क्रीडा मार्गदर्शक आबा धनगर यांचा धरणगाव तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ बुके व बुक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपस्थित क्रीडा शिक्षक व नागरिकांनी महेश वाघ व त्याचे मार्गदर्शक आबा धनगर यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी तालुका क्रीडा समन्वयक एस. एल. सूर्यवंशी तसेच डी. एन. पाटील, एम. डी. परदेशी, कैलास माळी, आर. बी. महाले, सेवानिवृत्त प्रा. ए. जी. शिंदे, व्ही. पी. महाले, कदम सर, नितिन पाटील, जितेंद्र ओस्तवाल, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, विकास शिरसाठ, के. एस. पाटील, शेख सर आदी उपस्थित होते. या छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन क्रीडा महासंघाचे सचिव हेमंत माळी यांनी व्यक्त केले. महेश वाघ यास आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यशासाठी विविध सोयी सुविधा मिळाल्यास तो धरणगावचे नाव नक्कीच जागतिक स्तरावर उंचावेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

खेलकुद , महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED