राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत ओम डिसले यांचे यश

27

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.24सप्टेंबर):-राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आष्टी येथील वसुंधरा प्राथमिक विद्यालयाचे विदयार्थी ओम अजीत डिसले,श्रुती अजित डिसले,वैष्णवी बिबीशन पोकळे,ऋतुजा पांडुरंग लटपटे या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात सुद्धा अभ्यास करून राज्यात यश संपादन केले.राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत वसुंधरा विद्यालयाचे विद्यार्थी यांना ३०० पैकी खालील प्रमाणे गुण मिळविले आहे.

ओम डिसले २७८,वैष्णवी पोकळे,२९८,ऋतुजा लटपटे २७६,श्रुती डिसले २७६ या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस,संस्थेचे संस्थापक मनोज धस,सुर्यकात मोकाशे,अविनाश कदम, अँड राकेश हंबर्डे,सुनील कर्डीले,अजित डिसले,प्रदिप कर्डीले,नितेश गुदेचा,अक्षय धुमाळ,राजु डिसले,किरण नालकोल,शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा बोंदार्डे,शिक्षक मंगेश भालेराव,सचिन काळे,वर्गशिक्षिका वैशाली चव्हाण,शिक्षिका सारीका शिंदे,रोहिणी ढगे,वर्षा जाधव,वर्षा कचरे आदींनी स्वागत केले.