बाबूपेठ येथील अमृत पाणीपुरवठा योजनेचे शनिवारी उद्घाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(ता.२४सप्टेंबर):- : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. बाबूपेठ येथील या योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा शनिवार ता. २५ सप्टेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते होणार आहे.

लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती राहणार आहे.गुरुवारी सकाळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी गुरुवारी बाबूपेठ येथील जुनोना चौकातील विविध भागांत नळांची पाहणी केली. त्यात पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे आढळून आल्याने शनिवारी लोकार्पण होणार आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED