श्री.छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टीच्या विद्यार्थ्यांचे पदवीत्तर पदवी (सी.ई.टी) परिक्षेत घवघवीत यश

28

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.24सप्टेंबर):-कृषी शिक्षणामध्ये पदवीत्तर पदवीसाठी (एम. एस. सी.एग्रीकल्चर) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश (सी.ई.टी ) परीक्षेमध्ये आनंद चॅरीटेबल संस्थेच्या श्री.छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कु. अभिषेक घोडके याने ८६.५०% गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

तसेच कु.राऊत मच्छिंद्र ७१.००% ,कुमारी समीक्षा क्षिरसागर ७०.५०%,कुमारी प्रतीक्षा जायभाय ६७.५०%,कु.विजय तेजा ६४.००% आणि कुमारी समनविथा टमाटम ६०.००% आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमराव धोंडे,संचालक डॉ.अजय दादा धोंडे,कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,दत्‍तात्रय गिलचे,संजय शेंडे तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा.गोकुळ नवसारे,विद्यार्थी समुपदेशन कक्ष प्रमुख पोपट काळे,कार्यक्रम अधिकारी इर्शाद तांबोळी,नोडल ऑफिसर इंज.प्रवीण जाधव,परीक्षा विभाग प्रमुख महेश साबळे आदी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.