युवा उद्योजक श्री प्रकाश खोब्रागडे यांची ब्रम्हपूरी शहर यु.कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.25सप्टेंबर):-अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बी.व्ही.श्रीनिवास व प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मान्यतेने युवक काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.त्यानुसार ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्री सोनु नाकतोडे व ब्रम्हपूरी शहर युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी युवा उद्योजक श्री प्रकाश खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रोखठोक वाणी व समाजाप्रती जवाबदेही अशी श्री प्रकाश खोब्रागडे यांची ब्रह्मपुरी शहरात ओळख.युवा उद्योजक असल्याने व्यावसायिक क्षेत्र असो की, सामाजिक, राजकीय त्यामध्ये परिश्रम करणे व निस्वार्थी सेवा देणे हा त्यांचा बाणा त्यामुळे प्रभागातील व शहरातील युवा वर्गाचा मोठा ताफा त्यांच्या सोबतीला असल्याने नामदार श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सक्षम नेतृत्वात, शहरातील युवा वर्गाला काँग्रेस पक्षात नक्कीच न्याय मिळणार असा ठाम विश्वास नवनियुक्त काँग्रेस यु.शहरअध्यक्ष श्री प्रकाश खोब्रागडे यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपुर येथील एका कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानीताई वडेट्टीवार, जिल्हा प्रभारी इरशाद शेख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

त्यांच्या सदर नियुक्तीबद्दल ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा मंगलाताई लोनबले, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा योगीताताई आमले, जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, नगरपरीषदेचे गटनेता विलास विखार, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार यांसह ब्रम्हपुरी तालुक्यातील अन्य काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED