चामोर्शी- बिबट्याच्या भितीमुळे कर्मचारी धास्तावले- दुचाकीने न जाता कार ने करतात जाणे- येणे

🔹वनविभागाने रस्त्यालगत चे झुडपे कापण्याची मागणी

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.25.सप्टेंबर):- गडचिरोली जिल्ह्या हा जंगलाने व्यापलेला आहे. आष्टी पासून आलापल्ली , घोट , मूलचेरा ,चामोर्शी आदी मार्गावर दाट जंगल आहे. रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढल्याने जंगलातील काही दिसत नाही .सध्या बिबट्याने आष्टी परिसरात धुमाकूळ घातला आहे . हा बिबट रस्त्याच्या बाजूने जातांना बऱ्याच जणांनी पाहलेला आहे. झुडपांमुळे हा बिबट दिसत नाही .त्यामुळे वनविभागाने वरील सर्व मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेले झुडपे कापण्यात यावे .अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे . बिबट्याने एका मुलाचा बळी घेतल्याने सदर मार्गाने दुचाकीने जाणे- येणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे काही कर्मचारी दुचाकीने न जाता आता कार ने जाणे -येणे करीत असल्याचे दिसून येत आहे. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील शाळेचे शिक्षक , ग्रामसेवक ,तलाठी, नर्सेस , आरोग्य कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी असे बरेच कर्मचारी आष्टी येथे राहतात .आष्टी येथून आलापल्ली , अहेरी , महागाव , लगाम , अडपल्ली , सुभाषग्राम ,कोपरअली , मूलचेरा कोनसरी , कढोली , येणापूर आदी गावाला हे कर्मचारी दुचाकीने जाणे – येणे करतात . मात्र आता बिबट्याने एका मुलाला ठार केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी जि.प.सदस्य रुपाली पंदिलवार व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां निवेदन ही दिले मात्र त्यावर वनविभागाकडून अजूनपर्यंत कोणतीच कारवाही झाली नाही. काही दिवसांपूर्वी आष्टी ते आलापल्ली मार्गावरील रस्त्यालगत झुडपे कापण्यास सुरवात झाली होती . मात्र त्यानंतर उपविभागीय वनाधिकारी ,वन्यजीव आलापल्ली यांनी त्यांना झुडपे कापण्यास मनाई केली . अशी माहिती प्राप्त झाली आहे. या झुडपात लपून असलेले बिबट व अन्य हिंस्त्र प्राणी रस्त्याने जाणाऱ्यांना दिसत नाही त्यामुळे हे झुडपे कापण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED