नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “भव्य नेत्ररोग आणि रक्तदान शिबीर “

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.25सप्टेंबर):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा सप्ताह” म्हणून रविवार दिनांक 26 सप्टेंबर ,2021रोजी, विरकरवाडी (म्हसवड)ता.माण, जि. सातारा येथे प्राथमिक शाळा विरकरवाडी या शैक्षणिक संकुलाच्या भव्य पटांगणात “नेत्ररोग आणि रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.या सुवर्ण संधीचा लाभ म्हसवड आणि म्हसवड पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवाजीराव शिंदे,माण तालुका भाजपा अध्यक्ष आणि अब्दागिरे, साहेब,म्हसवड शहर-भाजपा अध्यक्ष यांनी केले आहे.

सदर शिबीर , डॉ. लता मोरे आणि डॉ. रविंद्र बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष,माण-खटाव चे लोकप्रिय आमदार जयकूमार गोरे,प्रमुख पाहुणे विक्रम पावसकर,अध्यक्ष,सातारा जिल्हा भाजपा हे असणार आहेत.कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता पार्टी म्हसवड.करणार आहेत.

यासाठी सेवा सदन लाईफ लाईन हाॅसपिटल,मिरज आणि मायणी मेडिकल कॉलेज मायणी यांच्या सौजन्याने होणार असून सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेवक, आप्पा विरकर, विठ्ठल सजगाणे सर, नगरसेवक दिपक बनगर, मार्केट कमिटी सदस्य,अमोल राऊत, हणमंत राखुंडे,सचिन विरकर,हैबती विरकर,नामदेव विरकर, नगरसेवक विठ्ठल राखुंडे मा. नगरसेवक ईश्वरा खोत, मा. नगरसेवक, खंडु प्रेमा गलंडे, सेवा सोसायटी चे उपाध्यक्ष- श्री. संजय सजगाणे सर, श्री. नारायण गलंडे, श्री. मधुकर आत्माराम विरकर, मा. संतोष विरकर (मसाईवाडी) , मदने-बनगरवाडी , चंद्रकांत केवटे,लुनेश विरकर, लक्ष्मण करले,दादा तांदळे, हिरामण विरकर , विठ्ठल हाके,मच्छिंद्र विरकर आदी ग्रामस्थांसह,विरकरवाडी मधील सर्व गणेश मंडळे आणि नवतरुण मंडळी प्रयत्नशील आहेत.
तरी म्हसवड व पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील जास्तीत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करणेत येत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक, स्वास्थ 
©️ALL RIGHT RESERVED