आत्मा अंतर्गत “कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी” शेतकरी-शेतमजूर यांचे प्रशिक्षण

50

✒️अमोल उत्तम जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(दि.25सप्टेंबर):- कृषी विभाग आत्मा अंतर्गत कौशल्याधारित काम करणाऱ्या शेतकरी-शेतमजूर यांचे प्रशिक्षण जिजाऊ भवन पुसद रोड उमरखेड येथे घेण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरंग लिंबाळकर (तालुका कृषी अधिकारी उमरखेड) यांनी शेतकऱ्यांना फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर करावा तसेच लेबल क्लेम नुसार कीटकनाशकाची फवारणी करावी या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जी एस पेंटवाड (मंडळ कृषी अधिकारी उमरखेड) यांनी केले. आशिष मोघे (सिंजेंटा इंडिया लिमिटेड सुरक्षित फवारणी अभियान जिल्हा समन्वयक यवतमाळ )यांनी उपस्थित शेतकऱ्यांना व शेतमजुरांना कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी व विषारी अतिविषारी कीटकनाशक त्यांची ओळख या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एस ए जाधव (कृषी सहाय्यक) यांनी लेबल क्लेम कीटकनाशकाचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले.

अशोकरावजी वानखेडे (उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी) यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन व जैविक पद्धतीचा वापर करावा या बाबत मार्गदर्शन केले. सुदर्शन रावते (स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष) यांनी उपस्थित शेतकरी याना मार्गदर्शन केले. सुनील देशपांडे मंडळ कृषी अधिकारी ढाणकी -2 यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी संदर्भात सविस्तर माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एम पवार कृषी सहाय्यक यांनी केले. व आभार एस एस परतवाड कृषी सहाय्यक यांनी मानले .

यावेळी उपस्थित कृषि पर्यवेक्षक व्ही एस हमद, आर एन शिंदे, पी पी गुंढारे, जी एम मंगलवाड, रत्नदीप धुळे BTM कृषी सहाय्यक जी व्ही कापसे, व्ही टी मुसने, ए व्ही कदम, बी बी मोटे, जे एम कदम, एस एल भाग्यवंत, पी टी इंगळे, जी एन बिरंमवाड, एस एम बडेराव, कु जे एस ढवळे, एस पी पायघन, सौ सि डी गव्हाने, कु एस व्ही चद्दरवार, कु एम पी मेंडके व शेतकरी /शेतमजूर आणि कृषी मित्र उपस्थित होते. कृषिमित्र विकास मुटकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कृषिमित्र व पत्रकार मनोज सूर्यवंशी व अमोल जोगदंडे यांचा यावेळी तालुका कृषि अधिकारी यांचा हस्ते पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.