बदलापुर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ प्रविण निचत त्यांची राज्यस्तरीय कार्य गौरव

23

🔹समाजरत्न अवार्ड 2021 साठी निवड

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले(पुणे प्रतिनिधी)

पुणे(दि.25सप्टेंबर):-बदलापुर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ प्रविण निचत ह्यानी शतायुषी निसर्ग उपचार केंद्र मुंबई व होप फाऊंडेशन मुंबई तर्फे कोरोना साथीच्या काळात उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी केल्या कार्याबद्दल ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ने त्यांची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय कार्य गौरव समाजरत्न अवार्ड 2021 साठी निवड झाल्याचे जाहीर केले आहे.

कोरोना साथीच्या काळात आपल्या विभागातील, देशासाठी, समाजासाठी जीवाची परवा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल डॉक्टर प्रवीण निचत ह्यांना ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मानित करण्याचे योजिले आहे.

ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन जवळपास 130 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.