विदर्भात २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी

🔹विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.25सप्टेंबर):- विदर्भावर अन्याय करणारा नागपूर करार दिनांक २८ सप्टेंबर १९५३ रोजी झाला होता. विदर्भ महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यावर विदर्भावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. विकास कामे असो की सरकारी नोकरभरती या सर्वच बाबतीत विदर्भाला सापत्न वागणूक मिळाली. यामुळे येथे अनेक प्रश्न, समस्या निर्माण झाल्या. गेल्या ६८ वर्षापासून सर्व काही विदर्भात असताना आणि विदर्भ सक्षम राज्य होऊ शकते, हे माहित असताना ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी या विदर्भातील भोळ्याभाबड्या जनतेचा फायदा घेत या क्षेत्राला मागास ठेवले. नागपूर कराराच्या अटी व शर्ती न पाळता केलेला हा करार अर्थशून्य आहे. म्हणून दिनांक २७ सप्टेंबर १९५३ साली केलेल्या या कराराची दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी होळी करण्यात येणार आहे.

विदर्भातील सर्व अकराही जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती या कराराच्या प्रतींची होळी करून निषेध नोंदविणार असुन चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या या आंदोलनात नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, डॉ.श्रीनिवास खांदेवाले,जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर,विदर्भ सचिव मितीन भागवत,युवा आघाडी अध्यक्ष सुदाम राठोड,शहराध्यक्ष अनिल दिकोंडवार, कपिल ईद्दे, हिराचंद बोरकुटे, सुधीर सातपुते,अरुण नवले,गोपी मित्रा, रमेश नळे, प्रभाकर ढवस, अरुण वासलवार, प्रा.नीळकंठ गौरकार, तुकेश वानोडे, अँड.प्रफुल्ल आस्वले, डॉ.संजय लोहे, रमाकांत मालेकर, अँड.श्रीनिवास मुसळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED