20 लाखाची खंडणी मागणारा आरोपी गजाआड

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25सप्टेंबर):-शहरातील सराफा व्यापारी महेंद्र टाक यांचा घरात चिठ्ठी टाकून 20 लाखाची खंडणीची मागणी दोन वेळेस करून पैसे न दिल्यास संपूर्ण कुंटुबास जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या खंडणीखोर स.समीर स.अमीर उर्फ बाबा वय 23 यास पोलिसानी गजाआड केले आहे.आरोपीस न्यायालयाने सोमवार पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली.

शहरातील मुख्य बाजारपेठ भगवती चौक रोडवर महेंद्र टाक यांचा घराचा चॕनल गेट मध्ये दि.4 व दि.11 रोजी चिठ्ठी टाकून 20 लाखाची खंडणीची मागणी केली होती सदरील खंडणीखोर सीसीटिव्हीत कैद झाला होता. खंडणी न दिल्यास संपूर्ण कुंटुबास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.या प्रकाराने सराफा व्यापाऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी महेंद्र टाक यांचा फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरोधात दि.18 रोजी कलम 384 385 386 नुसार गुन्हा दाखल झाला होता.केवळ सीसीटिव्हि फुटेजचा आधारे सदरील आरोपीस अटक करणे पोलिसा समोर एक आव्हानच होते.सीसीटिव्ही मध्येही चेहरा रूमालाने झाकलेला व एकाच बाजूने दिसत होता.

याच आधारे पोलिस निरीक्षक वसुधंरा बोरगावकर यांचा मार्गदर्शना खाली सहा पोनि गुलाबराव बाचेवाड पोलिस अंमलदार इगंळे व शिंदे यांनी घटना घडलेला मुख्य रस्ता शहरातील जीमसह महेंद्र टाक यांचा घराच्या परीसरात तपास केला आसता संशयावरून स.समीर.स.अमीर उर्फ बाबा वय 23 यास ताब्यात घेत विचारपुस केली आसता देहबोली हस्तक्षर व खंडणीच्या चिठ्ठीतील हस्तक्षर जुळून आले पोलिसानी खडसावून विचारपुस केली आसता त्यांने केलेल्या गुन्हाची कबुली दिली.

केवळ पोलिसानी पाच दिवसात गुन्हा उघडकीस आणल्याने सराफा व्यापारी वर्गाने सुटकेचा श्वास घेतला.पोलिसांनी आरोपी स.समीर स.अमीर यास न्यायालयात हजर करून चार दिवसाचा पीसीआर मागिताला आसता न्यायालयाने मान्य केला.