राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरून द्यावे… – विजय दराडे

25

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

माजलगाव(दि.२५सप्टेंबर):-आरोग्य विभागाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हॉल तिकीट पासून सुरू झालेला गोंधळ आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे व ढिसाळ नियोजनामुळे अखेर परीक्षा आज रद्द झाली. राज्य सरकारने बोगस (एजन्सी) संस्थेच्या हातात परीक्षेचा कारभार दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत मनस्ताप सहन करावा लागला आहे. अचानक परीक्षा रद्द करून महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक दृष्ट्या नुकसानीत टाकलेला आहे.

बरेच विद्यार्थी परीक्षेचे सेंटर इतर जिल्ह्यात आल्यामुळे अडचणीच्या काळात सुद्धा प्रवास खर्च करून पोहोचलेले असताना ऐनवेळी परीक्षा रद्द करणे हा आरोग्य विभागाचा आणि आरोग्य विभागाच्या हेकेखोर संचालक अर्चना पाटील यांचा गलथान कारभार जबाबदार आहे. या सर्व प्रकारची व बोगस एजन्सीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

सर्व मुलांची होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन भरपाई म्हणून सर्व मुलांना खर्च झालेला प्रवास भत्ता राज्य सरकारने द्यावा. आरोग्य विभागाच्या परीक्षेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी राजीनामा द्यावा किंवा राज्य सरकारने त्यांना निलंबित करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय दराडे यांनी केली आहे.