दिग्रस येथे प्रज्ञावंताचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

दिग्रस(दि.25सप्टेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळ (र.नं.एफ.११९९३)दिग्रसद्वारा दहावी व बारावी मध्ये दिग्रस शहरातुन बौध्द समाजातुन गुणानुक्रमे प्रथम तीन येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार ले-आउट नुकताच संपन्न झाला .

या कार्यक्रमात सन २०१९ -२० व २१ मधील १६ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा आणि या दोन वर्षात सेवानिवृत्त झालेल्या १७ कर्मचाऱ्यांचा सत्कार मोठ्या संख्येने उपस्थित बौद्ध समाज बांधव भगिनीच्या उत्साहपूर्व उपस्थिती संपन्न झाला सत्काराप्रित्यर्थ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र ,आकर्षक सन्मानचिन्ह, (बोधिवृक्ष) पिंपळवृक्षाचे रोपटे व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले .विविध शाळा तथा कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शाल, सेवा सन्मानपत्र ,बोधिवृक्ष पुष्पगुच्छ देऊन सहकुटुंब सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या सत्काराला उत्तर देताना कु. अनुष्का खडसे (संशोधक), डॉ. आकाश मुनेश्वर ,आर्पित देवतळे तसेच सेवानिवृत्तांच्या वतीने नगरसेवक कैलास जाधव यांनी सत्काराला आपल्या प्रतिक्रियेत उत्तर दिले अतिशय नियोजनबद्धरित्या आयोजित या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अशोकराव आठवले तर प्रमुख अतिथी म्हणून दीपक नगराळे यांच्यासह विचार मंचावर डॉ. वाल्मीक इंगोले , रवीभाऊ तुपसुंदरे , भारतीय बौद्ध महासभा शाखा दिग्रसचे अध्यक्ष विनायक देवतळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

डी.डी.मनवर यांनी सूत्रसंचालन केले तर धनजय मस्के यांनी आभार मानले .लता भरणे यांनी स्वागत गीत गायले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED