ज्ञानोदय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय म्हसावद राबवत आहेत स्तुत्य उपक्रम!

🔹शाळा बंद पण शिक्षण सुरू!

🔸शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी!!

✒️पी डी पाटील(विशेष प्रतिनिधी)

म्हसावद- कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना मंदिरावर शाळा भरून त्यांना अध्यापनाचे उत्कृष्ट असे कार्य करीत आहेत .

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन व मंदिरावर अथवा उपलब्ध असेल अश्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करत आहे.

यासाठी श्री.राजेंद्र भावराव जोगी सर व श्री.प्रशांत रवींद्र पाटील सर हे शिक्षक बोरणार, म्हसावद ,नागदुली येथे जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे शिकवत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष दादासो.पंकज साळुंखे सर व मुख्याध्यापिका सौ दिपाली पाटील मॅडम यांनी वैचारिक सबळता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी , विद्यार्थ्यांचा गेलेला वेळ भरून निघावा , यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले . व त्या भावनेतून विद्यार्थी व शिक्षक हे नाते वृद्धिंगत होण्यासाठी बळ मिळते .असे शिक्षक वृंद यांनी महाराष्ट्र न्युज २१ शी बोलतांना सांगितले.

खेड्यातील पालकांची मोबाईल घेण्याची व डिजिटल साहित्य उपलब्ध होण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने शिक्षक मंदिरावर शाळा भरून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.शिक्षक आपल्या दारी पाहून विद्यार्थ्यांना ही नवचैतन्य मिळत आहे. परिसरात ज्ञानोदय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय म्हासावद यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED