ओबीसी हक्क परिषद यशस्वीरीत्या संपन्न

23

🔸सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र या !- छगनरावजी भुजबळ

✒️पी डी पाटील(विशेष प्रतिनिधी)

जळगाव(दि.26सप्टेंबर):- ओबीसी हक्क परिषद, जळगाव येथे संपन्न झाली.या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, माजी पालकमंत्री सतिशअण्णा पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटील, मुस्लिम ओबीसी नेते शब्बीरजी अन्सारी, धनगर समाजाचे नेते रामहरी रुपनवार, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला ओबीसींचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक आरक्षण अबाधित राहण्यासाठी ओबीसींना वेळीच जागृत झाले पाहिजे असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

ओबीसींचे न्याय व हक्क अबाधित रहावे, त्यांना न्याय मिळावा यासाठी संघटन शक्ती दाखवण्याच्या उद्देशाने लहान माळी वाडा परिसरातील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे जेष्ठ सदस्य माधवराव पाटील, अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, कोषाध्यक्ष लक्ष्मण पाटील, सदस्य राजेंद्र पाटील (महाले), परशुराम पाटील, अशोक (आप्पा) पाटील, आनंदराज पाटील, संजय पाटील तसेच विजय ज्वेलर्स चे संचालक बापूरावशेठ सोनार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, महात्मा फुले हायस्कूल चे उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील सर, हेमंत माळी सर, व्ही. टी. माळी सर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक चे किशोर पवार सर, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, समस्त नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक झुंजारराव, सदस्य कमलेश बोरसे, विनोद रोकडे, रवि जाधव, पिंटू फुलपगार सोबतच शिंपी समाजाचे जगताप टेलर व इतर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.