साताळी येथे शबरी घरकुल योजनेचा पाया एका अज्ञात व्यक्तीने केला उद्धवस्त

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.26सप्टेंबर):-साताळी येथी एक गरिब कुटुंब संगिता अण्णासाहेब गायकवाड हे आपल्याला शबरी घरकुल मंजूर झाल्या नंतर ते बांधण्या साठी साताळी ग्रामपंचायत ने त्यांना जागा दिली असता त्या जागेवर त्यांनी घर बांधण्यासाठी बांधकाम सुरू केले असता त्यांनी बांधलेले दगड वाळू सिमेंडचे बंदकाम असलेले त्यांच्या पाया एका अज्ञात व्यक्तीने रात्री तोडला आहे त्यांनी सकाळी उठल्यावर आपल्या कामावर पाणी मारण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या घराचे काम कुणीतरी पाडून टाकले आहे.

त्यांनी जवळच राहत असलेल्या आपल्या मामाला बोलावून आपले पडलेले काम दाखवले असता गायकवाड त्यांच्या मामांनी सरपंच, पोलीस पाटील,तंटा मुक्ती अध्यक्ष, यांना फोनवर सर्व कळवले असता ते सर्व स्पॉट पहाणी साठी आले त्या वेळी सर्वांनी गायकवाड कुटुंबाची समजुत काढून त्यांना धीर दिला आणि या पुढे तुम्हाला जर त्रास झाला किंवा अशी घटना घडली तर ग्रामपंचायत चा वतीने जो कुणी असे कृत करीत असेल त्यांना ग्रामपंचायत स्वतः पोलिसात तक्रार दाखल करु या प्रसंगी सोसायटीचे मा,चेरमान पुंजराम काळे,तंटा मुक्ति अध्यक्ष मच्छिंद्र काळे, जेष्ट नेते दिलीप काळे, ग्रामपंचायत उपसरपंच गणेश कोकाटे ग्रामपंचायत सदस्य अमोल सोनवणे कृष्णा कोकाटे पोलीस पाटील काळे, ज्ञानेश्वर मोरे आदी गायकवाड परिवार उपस्तीत होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED