माजी आ. डॉ.मधुसूदन केंद्रे व माजी आ. सीताराम घनदाट मामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाढवणार ताकत

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26सप्टेंबर):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मा.जयंत पाटील हे येत्या मंगळवार दिनांक 27सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गंगाखेड शहरात साई वृंदावन परिवार संवाद यात्रे निमित्य ते गंगाखेड विधानसभा मतदार संघाचा आढावा बैठक घेणार आहेत तसेच माजी आ. डॉ.मधुसूदन केंद्रे व माजी आ. सीताराम घनदाट मामा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट एकत्र येवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ताकत वाढवण्याची निर्धार करण्यात आला आहे असे बोलें जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मा.जयंत पाटील हे येत्या मंगळवार दिनांक 28सप्टेंबर रोजी सकाळी 09.30 वाजता गंगाखेड शहरात परिवार संवाद यात्रे निमित्य दौऱ्यावर येत आहेत.

यावेळी माजी आ. डॉ.मधुसूदन केंद्रे व माजी आ. सीताराम घनदाट मामा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट यांच्या उपस्थितीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणार असून आगामी काळात होणाऱ्या गंगाखेड नगर पालिका, नगर पंचायत पालम,जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच सहकार क्षेत्रातील होणाऱ्या निवडणूका माजी आ. डॉ.मधुसूदन केंद्रे व माजी आ. सीताराम घनदाट मामा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर एकत्र येवून काम करणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आनंदा चे वातावरण निर्माण झाले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी विधानसभा चे अध्यक्ष श्रीकांत भोसले, गंगाखेड तालुका अध्यक्ष माधव भोसले, उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ, पालम तालुका अध्यक्ष वसंतराव सिरसकर, पूर्णा तालुका अध्यक्ष शहाजी देसाई गंगाखेड शहरअध्यक्ष सय्यद जमीर, पालम शहरअध्यक्ष इमदाद खान तसेच पूर्णा शहरअध्यक्ष अखिल अहेमद आदीने केले आहे.