अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार – आ. रत्नाकर गुट्टे

25

🔸आ. गुट्टे यांचे इसाद मध्ये जंगी स्वागत

🔹मौजे ईसाद येथे आमदार गुट्टे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26सप्टेंबर):-दि.२४ सप्टेंबर शुक्रवार रोजी गंगाखेड तालुक्यातील मौजे ईसाद येथे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे इसाद नगरीमध्ये आगमन होताच असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ईसाद येथील मुख्य रस्त्यावरील बसस्थानकापासून ते श्रीकृष्ण मंदिरापर्यंत म्हणजेच जवळपास १ कि.मी. अंतरापर्यंत फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या अंथरूण वाजत गाजत फटाक्यांच्या आताशबाजी मध्ये आ.गुट्टे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आमदार गुट्टे यांनी इसाद येथील प्रसिद्ध शिवस्मारकास भेट देऊन छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. निमित्त होते आ. गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधीमधून मौजे ईसाद येथे दिलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे. मौजे इसाद येथील श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते.

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सदरील मंदिराच्या सभामंड बांधकामाकरिता १५ लक्ष रुपयांचा विकास निधी दिला. आज या विकास कामाचे भूमिपूजन महानुभाव पंथातील थोर महंत प्रनद दादा मुनी आणि आमदार गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ईसादच्या नागरिकांनी मला भरपूर प्रेम दिल्याने मी येथे मतदानात एक नंबरवर राहिलो. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील जनतेने मला जिवनदान दिले असून माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी जनतेची सेवा करणार असल्याचे भाऊक उदगार आमदार गुट्टे यांनी यावेळी काढले.

याप्रसंगी सत्कार मंचावर जि.प. सदस्य किशनराव भोसले. मौजे ईसाद ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सविता उद्धवराव सातपुते, गंगाखेड मार्केट कमिटीचे संचालक उद्धवराव सातपुते, इसाद सोसायटीचे चेअरमन तथा गंगाखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती रामप्रसादजी सातपुते, गंगाखेड शुगरचे मा.संचालक राजेभाऊ बापु सातपुते तर या कार्यक्रमास बाळासाहेब पौळ,भाऊसाहेब भोसले, डॉ. डिगांबराव भोसले, रोहिदास भोसले, भगवानराव सातपुते, कृष्णा भोसले, कवी विठ्ठल सातपुते यांच्यासह मौजे इसाद नगरीतील असंख्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.डी. भोसले यांनी केले. यावेळी येथील गोसाव्याचा मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे नारळ ही फोडले,सातपुते गल्ली येथील सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन आमदार गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.