आरोग्य विभाग भरती प्रक्रियेतील ढिसाळ कारभाराविरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा द्वारे विद्यार्थी आक्रोश मोर्चा

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9975686100

म्हसवड(दि.26सप्टेंबर):-“माय बाप म्हणते शाळा शिक,सरकार म्हणते पकोडे विक, “शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.”अशा अनेक घोषणांनी दि.25 सप्टेंबर 2021 रोजी सातारा शहर दणानले.या संदर्भातील अधिक माहीती अशी की,दि.25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क च्या 2739 व गट ड 3436च्या जागांसाठी सरकारने परिक्षा आयोजित केलेली होती.दरम्यान या परीक्षेचे प्रवेश पत्र चार दिवस आगोदर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते.सदर प्रवेश पत्रांमध्ये प्रचंड चुका करण्यात आलेल्या होत्या. जसे पालकांच्या जागी पाल्याचे नाव अथवा पाल्याच्या जागी पालकांचे नाव टाकण्यात आले.ह्या चुका कमी म्हणुन प्रवेश पत्रांवर थेट उत्तरप्रदेश व चिन मधील परीक्षा केंद्रे लिहुन सरकारने कळंसंच केला.

एवढेच प्रताप करून सरकार थांबले नाही तर गृह जिल्ह्यापासुन तब्बल तिनशे ते पाचशे किलोमिटर अंतर असणारे परिक्षा केंद्र विद्यार्थ्यांना दिले गेले.अशा प्रचंड मोठ्या चूकांनंतर घाबरून
“ही परिक्षा नियोजित वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीनेच होईल”.अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली होती.राज्य सरकारने या परीक्षेचे कंत्राट ‘न्यास’ नामक खाजगी कंपनिला दिले होते.त्या कंपनीद्वारेच सरकारच्या अनागोंदी कारभाराचे हे प्रताप राज्यभर पहावयास मिळाले.

लाॅकडाऊन ,कोरोना सारख्या बेताच्या परिस्थितितुन विद्यार्थी,युवा, बेरोजगार होरपळुन निघत असतानाच कशीबशी या परिक्षेला जाण्याची आर्थिक तयारी करून परिक्षेच्या एक दिवस आगोदर परीक्षाकेंद्रांवरती पोहचत असताना अचानक रात्री 10 वाजता महाराष्ट्रातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वर परिक्षाच रद्द झाल्याचा संदेश आला. आणि राज्यात परीक्षार्थींमध्ये एकच खळबळ उडाली.काही विद्यार्थी घरच्या जेमतेम परीस्थीतुन परीक्षेला गेले होते. कुणी स्टेशन,बसस्थानकांवरती झोपेलेले होते.अशात हा निर्णय झाला. ज्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड निराशा झाली.

सरकारच्या या सर्व विद्यार्थी विरोधी भुमिकेविरोधात,दि.25/09/2021 रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चा ने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत एकाचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयांवर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढला.याअंतर्गत सातारा जिल्हाधिकारी येथे मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चा चे नेतृत्व भारतीय विद्यार्थी मोर्चा चे राज्य प्रवक्ता, प्रथमेश ठोंबरे भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य,आणि भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष-चेतन आवडे यांनी केले.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राजिनामा द्यावा.

विद्यार्थ्यांना त्यांचे परिक्षा शुल्क वापस देण्यात यावे.
न्यास या खाजगी कंपनी कडुन या परीक्षेचे कंत्राट काढुन घेऊन संबंधित कंपनीवर योग्य ती कार्यवाही करावी.
सरकारने सर्वच विभागांतील भरती प्रक्रिया ह्या एमपिएससी मार्फत घेण्यात याव्यात.अशा विवीध मागण्यांचे निवेदन भारतीय विद्यार्थी मोर्चा ने सातारा जिल्हाधिकारी यांना दिले.सरकारने योग्य भुमिका न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

यावेळी,भारतीय विद्यार्थी मोर्चा चे शहर अध्यक्ष, रोहित नितनवरे, कोरेगाव तालुका अध्यक्ष, आदित्य कांबळे, BMP चे जिल्हाध्यक्ष तुषार मोतलिंग,‌BMP शहर अध्यक्ष, हंबीरराव बाबर,रफिक मुलाणी,यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी,युवा,बेरोजगार उपस्थित होते.सदर मोर्चा ची शहरात सर्वत्र एकच चर्चा होत आहे.