पतंजली योग समिती तर्फे जय श्रीराम मंदिर कुर्झा (विद्यानगर )येथे योग केंद्राचे उद्घाटन

30

🔸योग निरोगी जीवनाचा आधार : नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27सप्टेंबर):-कोरोना महामारीच्या कटू अनुभवातून आपण सगळे बरंच काही शिकलोय.आरोग्याचं महत्व सगळ्यांना कळलं आहे. म्हणूनच सर्वांनी निरोगी , स्वस्थ जीवन जगण्यासाठी नित्यनेमाने योग-प्राणायम करणे गरजेचे आहे.असे उपरोक्त प्रतिपादन ब्रम्हपुरी नगराच्या नगराध्यक्षा सौ. रिता उराडे यांनी नवनिर्मित जय श्रीराम मंदिर कुर्झा (विद्यानगर )येथील ‘ योग केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले.याप्रसंगी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी भगवानजी पालकर यांनी योग- प्राणायमाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्व योगसाधकांना पटवून दिले.

विविध योगप्राणायमाचे प्रात्याक्षिकांचे प्रशिक्षण त्यांनी उपस्थितांना दिले. नगराध्यक्षा रिता उराडे तथा जिल्हा प्रभारी भगवानजी पालकर यांनी जय श्रीराम मंदीर कुर्झा (विद्यानगर) येथे दिपप्रज्वलन आणि योगी महापुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून पतंजली योग समिती ब्रम्हपुरी च्या नविन योग केंद्राचे उद्घाटन केले.

कुर्झा (विद्यानगर) वासीयांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेल्या योग केंद्राचा सर्वांनी लाभ घ्यावा असे प्रमुख अतिथींनी आवाहन केले. याप्रसंगी प्रामुख्याने भारत स्वाभिमान न्यास ब्रम्हपुरी तालुका प्रभारी भगवानजी कन्नाके तसेच योगसाधक डुमेश नाट,मधुकर खेत्रे, हरीराम सेलोकर , अरविंद अलोने , नेहाताई सेलोकर , रश्मी ठक्कर व वार्डातील बालगोपाल मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी जय श्रीराम मंदीर कमिटीचे सर्व सदस्य, पतंजली योग समिती तालुका प्रभारी नरेश ठक्कर, चंद्रपूर जिल्हा मिडिया प्रभारी सुभाष माहोरे , ताराचंद पिलारे , दिलिप कामथे व विज्ञानगरवासियांनी मोलाचे योगदान दिले.