गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम शितल तांबे,तर द्वितीय विद्या ढेरे

30

🔹आ.सुरेश धस मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.26सप्टेंबर):-आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.या ही वर्षी गणेश उत्सवानिमित्त आष्टी व मुर्शदपुर शहरातील महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये शीतल तांगडे यांनी प्रथम,विद्या ढेरे यांनी द्वितीय तर ज्योती पवार व सिद्धी पानसांडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविले असल्याने आ.सुरेश धस व सौ.प्राजक्ताताई धस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निवासस्थानी रविवार दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस व सन्मानचिन्ह नगरपंचायतच्या सभापती वैशाली निकाळजे,सुजाता झरेकर,आदर्श शिक्षिका सुनीता उगले,अनिता रोडे या मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव सर्वत्र शांततेत पार पडले आहेत.त्यामुळे यंदा घरच्या घरी होणाऱ्या उत्सवामध्ये आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने आष्टी व मुर्शदपूर येथील नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये २१ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.यातून निवडण्यात आलेल्या विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणा-या शितल तांगडे यांनी बप्पा मला शाळेत जायचय,कोरोना नष्ट कर,आधुनिक गौरी लॅपटॉपवर दाखवली होते तर द्वितीय क्रमांक पटकाविणा-या विद्या ढेरे यांनी कोरोना दूर कर,विठ्ठला वारी सुरू कर ही रांगोळी रेखाटून विठ्ठलाला साकडे घातले.

निसर्गाचे सौदर्य बालाघाटाच्या रंगाच त्यांनी उभारले होते.तर तृतीय क्रमांक पटकाविणा-या ज्योती पवार यांनी नोपॉलिशन ईज द ओन्ली सोल्युशन,गौरीची मांडणी तर सिद्धी पानसांडे गड किल्याची उभारणी या विजेत्यांना रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह तसेच सहभागी स्पर्धकांना मित्र मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले.यावेळी स्पर्धेतील सहभागी महिला व इतर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.