महिला मुक्ती मोर्चाने केले वृक्षारोपण

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27सप्टेंबर):-महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तथा शहर येथील पदाधिकाऱ्यांनी महाकाली मंदिर परसरात वृक्षारोपण केले.

या वृक्षारोपण करताना चंद्रपूर जिल्हा विधी सल्लागार ऍड.मदन भैसारे, महासचिव अजय गोवर्धन, शहर अध्यक्ष श्वेताताई फंदी, उपाध्यक्ष सुषमाताई करेवार, शहर महासचिव कीर्तीताई गुरूनले, सदस्या वंदना दोरके,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तथा शहर येथील पदाधिकारी हे सामान्य माणसाच्या समस्या घेऊन नेहमीच काम करीत असतात, त्यासोबतच रचनात्मक कामात अग्रेसर राहण्यासाठी वृक्षारोपण सारखे उपक्रम राबविण्यात प्रयत्न करताना दिसत आहे, त्यांचे कामावर जनता समाधान व्यक्त करीत आहे.