पशुपालक बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन

27

🔸रिलायन्स फाउंडेशन नागपूर यांचा उपक्रम

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)

नागपूर(दि.27सप्टेंबर):- रिलायन्स फाऊंडेशन माहीत सेवा नागपूर व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील पशुपालकांना डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स च्या साहिय्याने मार्गदर्शन करण्यात आले.नागपूर जिल्ह्यातील पशुपालकांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश खंगार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. शरद जोशी पशुविकास अधिकारी नागपूर यांनी पशुपालकांना गाय, म्हशी , बैल , शेळी , कोंबड्यान वरती पोक्षक आहार आपण कशा पद्धतीने जनावरांना देऊ शकतो व तो कसा घरच्या घरी तयार करता येतो यावर मार्गदर्शन केले. तसेच गोठ्याचे व जनावरांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे असे सांगितले.

त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शन म्हणुन डॉ सारीपुत लांडगे, सहाय्यक प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, तथा तांत्रिक अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय माफसु, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर , यांनी पशुपालकांना शेळी पालन व कुकुट पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यानी जोंडधंदा म्हणुन बघितले पाहिजे , तसेच शेळी व कुकुट पालन यामुळे शेतकऱ्याना किती फायदा होऊ शकतो यांचे आर्थिक समीकरण सुद्धा पटवुन दिले.

या प्रसंगी नागपूर जिल्ह्यातील , 2 तालुका येथील 7 गावातील 31 पशुपालकांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्तीत पशुपालकांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व पशुपालकांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.