माळी समाज धरणगांव कडुन ” राष्ट्रीय कुस्तीपटु ” महेश वाघ यांचा जाहीर सत्कार

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी. पाटील सर)

धरणगांव(दि.27सप्टेंबर):- येथिल मोठा माळी वाडा येथिल रहिवासी चि. महेश रमेश वाघ ( माळी ) याने नुकत्याच हरियाणा राज्यामध्ये पार पडलेल्या स्टुडंट ऑलम्पीक खुल्या राष्ट्रीय कुस्ती स्परधेत ५५ किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. तसेच त्याची आंतरराष्ट्रीय स्टुडंट ऑलम्पीक कुस्ती खेळा मध्ये निवड झाली. त्याचप्रमाणे चेतन माळी याची पनवेल येथे पार पडलेल्या स्टुडंड ऑलम्पीक मध्ये ६५ कि. वजन गटात राज्यस्तरीय सुवर्णपदक पटकावल्या मुळे त्यांचा समाजाचा वतीने जाहिर सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे त्यांचे प्रशिक्षक पै. संदिप कंखरे व रमेश पहेलवान यांचा ही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माळी समाज अध्यक्ष श्री.विठोबा माळी, उपाध्यक्ष निंबाजी माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर, सचिव गोपाल माळी, सहसचिव डिगंबर माळी, विश्वस्त विजय महाजन, त्याच प्रमाणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपा ओबिसी जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, नगरसेवक कैलास माळी सर, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप माळी, युवा सेना प्रमुख संतोष महाजन, सुकदेव अण्णा, दशरथ महाजन, विकासो. चेअरमन वासुदेव महाजन, पत्रकार रविंद्र महाजन, विनायक महाजन, दामाजी महाजन, राजेंद्र महाजन, नरेंद्र माळी, गोपाल महाजन, कांतीलाल माळी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED