गडचिरोली- भारत बंद आंदोलन समर्थनात तालुका महाविकास आघाडी रस्त्यावर

✒️भास्कर फरकडे(विशेष प्रतिनिधी)

धानोरा(दि.27सप्टेंबर):- तालुका काँग्रेस कमिटी धानोरा तर्फे तहसील कार्यालय धानोरा येथे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निदर्शने करुन निषेध केल्याबाबत निवेदन देण्यात आले.

केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, डिझेल, पेट्रोल दरवाढ, शेतकरी आंदोलनाला विरोध, जातनिहाय जनगणनेला विरोध, शासकीय मालमत्तेचे खाजगीकरण व विक्री ह्या सर्व धोरणाविरोधात महाविकास आघाडी तालुका धानोरा (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना) तर्फे तालुका धानोरा येथील मुख्य चौकात निषेध व्यक्त करुन जाहीर पणे निदर्शने करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष मनोहर पोरेटी, सोपानदेव म्हशाखेत्री राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, शेखर उईके शिवसेना तालुका अध्यक्ष, विनोद लेनगुरे सदस्य जिल्हा परिषद, मुबारक अली सय्यद जेष्ठ नेते, परसराम पदा माजी सदस्य प.स, महागु वाडगुरे सदस्य प.स, कुलदीप इंदूरकर, मानिकशहा मडावी, वकीलभाई पठाण, प्रशांत कोराम, समीर कुरेशी, गोपिदास चौधरी, गिरीधर सोनुले, डॉ घनःश्याम राऊत, राजु मोहूर्ले, गणपत गुरुनुले, मिलींद किरंगे, नरेंद्र भैसारे, संजय गावडे, महेश चिमुरकर, अफरोज शेख, शकील पठाण, अनवर नाथानी, सचिन गावतुरे, भुषण भैसारे, मुकुल बोडगेवार, मंगेश नरचुलवार, अनिरुद्ध कुळमेथे, विलास कुमरे, पुरुषोत्तम बावणे आदि महाविकास आघाडी तालुका धानोरा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED