पत्रकार श्समाधान गाडेकर यांना मारहाण व गैरवर्तणुक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत कारवाई करावी- आमदार श्र्वेताताई महाले पाटील यांना दिले निवेदन

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनधी)

चिखली(दि.27सप्टेंबर):-शहरातील पत्रकार श्री समाधान गाडेकर यांना मारहाण व गैरवर्तणुक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत कारवाई साठी चिखली शहरातील सर्व पत्रकार बंधूनी निवेदन दिले. पोलिसांनी पत्रकारांसोबत गैरवर्तना बाबत दोषींवर अजून पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.

चिखली येथे गत २५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी श्री समाधान गाडेकर हे दिनांक १४/९/ २०२१रोजी सकाळी ११.३० सुमारास चिखली खामगाव रोड वरील हॉटेल अमृततुल्य समोर पोलिसांनी कार्यवाही करून एका ट्रकमधून गांजा पकडला ही माहिती मिळाल्यानंतर पत्रकार या नात्याने वृत्तसंकलन करण्यासाठी श्री गाडेकर त्याठिकाणी गेले व त्यांनी फोटो घेण्यासाठी मोबाईल काढला व फोटो घेतला असता श्री निलेश शेळके, हे समोरुन अंगावर धावत आले त्याच क्षणी मी पत्रकार आहे असे सांगत असताना पाठीमागून श्री दीपक वायाळ, पोलीस कॉन्स्टेबल यांनी व इतर एक जणांनी त्यांना पकडले यातील श्री दीपक वायाळ यांनी पत्रकार श्री समाधान गाडेकर यांना मारहाण व गैरवर्तणुक केली.

यावेळी गाडेकर यांनी त्यांना ओरडून पत्रकार असल्याचे सांगुनही त्यांचे मोबाईल मधील फोटो डिलीट करुन त्यांना दमदाटी केली व अरेरावी केली. या सर्व घटनेबाबत आमदार श्र्वेताताई महाले -पाटील स्वतः गृहमंत्री मा ना दिलीप वळसे पाटील यांची दि 16 सप्टेंबर 2021 रोजी भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करून कोणतीही कारवाई केली नाही.जिल्हा पत्रकार संघाने मा. जिल्हा पोलीस अधिक्षक याची व चिखली तालुका पत्रकार संघाने पोलीस उपविभागीय अधिकारी श्री बरकते यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार संघांनी ठिकठिकाणी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. मात्र अदयापही संबंधीतांवर काहीच कारवाई झालेली नाही. तरी आमदार श्र्वेताताई महाले – पाटील यानी प्रकरणी विधानसभेत आवाज उठविण्यासाठी सर्व पत्रकार बंधूनी निवेदन दिले.